झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता विनीत बोंडे लवकर विवाहबंधनात अडकणार आहे. मूळ औरंगाबादचा असलेल्या विनीतचा साखरपुडा त्याच्या घरी पार पडला.येत्या ४ मार्च रोजी औरंगाबादमध्येच विनीत बोहल्यावर चढणार आहे. विनीतची होणारी बायको सोनम पवार मूळ सोलापूरची आहे. नर्सिंगच्या प्रशिक्षणानिमित्त ती सध्या पुण्यात राहते. विनीतच्या साखरपुड्याला मोजक्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती.कधी लहान मुलगा, कधी पोलिस हवालदार तर कधी बाई, अशा वेगवेगळ्या रुपांमध्ये विनीत 'चला हवा येऊ द्या'च्या एपिसोड्समध्ये झळकला होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews